कोल्हापूर: येथील , बझार व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई विलासराव कोरे (वय ७७) यांचे सोमवारी पहाटे सोलापूर येथे निधन झाले. या गेले काही दिवस अजारी होत्या. सोलापूर येथे असणाऱ्या कन्या व जावई यांच्या हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ( President )

वाचा:

वारणा समूहाचे संस्थापक वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा सावित्रीआक्का विश्वनाथ तथा तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा समर्थपणे शोभाताई कोरे यांनी चालवत सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात आदर्श कार्य केले. महिला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वाना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात ‘आईसाहेब’ या नावाने सर्वत्र परिचित होत्या.

९ ऑक्टोबर १९४२ रोजी शोभाताई यांचा जन्म सिद्धेश्वर कोरोली (ता. खटाव) येथील कुटुंबात झाला. त्या काळात मुली शाळेत जात नव्हत्या. मात्र, चौकटीबाहेर जात शोभाताईंनी शिक्षण घेतले. तेव्हाच्या ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी’ची एम. ए. पदवी त्यांनी संपादन केली. त्यांचा विवाह सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे ज्येष्ठ पुत्र विलासराव कोरे यांच्याशी झाला. घरात सहकाराची पेरणी, त्यामुळे त्यांचा वेळ कार्यकर्ते व पै-पाहुणे गोतावळा यांच्या पाहुणचारातच जात असे. त्यामुळे त्यांच्यावर सहकाराची कोणतीही जबाबदारी नव्हती.

वाचा:

१९९३ मध्ये सर्वाधिक महिला सभासद असणाऱ्या वारणा बझार या संस्थेची चेअरमन पदाची जबाबदारी त्यांनी हातात घेतली आणि त्यांचे कर्तृत्व पहायला मिळाले. बझारचा विस्तार झपाट्याने झाला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांत शाखा सुरू झाल्या. त्यानंतर वर्षभरातच १९९४ मध्ये वारणा भगिनी मंडळांची सूत्रे त्यांनी हाती घेतली. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये चैतन्य आले आणि गरजू व निराधार महिलांचे भाग्य उजळले. महिलांच्या हाताला काम मिळाले. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उत्पादन करून विक्रीस जावू लागले. आज या पदार्थाची विक्री कोटी रुपयांच्या घरात आहे. सावित्रीआक्का कोरे यांच्या निधनानंतर त्यांनी वारणा सहकारी साखर कारखान्याची धुराही यशस्वीपणे अखेरपर्यंत सांभाळली.

वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत. शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here