सांगली: जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या सदृश्य पावसाने कहर केला. नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका शाळकरी मुलासह चौघे वाहून गेले. जनावरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यासह दोन म्हशी वीज पडून ठार झाल्या. अतिवृष्टीने सोयाबीन, भूईमूग पिकांसह द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. ( )

वाचा:

गेल्या चार दिवसांपासून सांगलीत रोज दुपारनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढत आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह बरसणा-या पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. रविवारी खानापूर, विटा, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, इस्लामपूर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तालुक्यातील लेंगरे येथे ओढ्याच्या पाण्यातून केदार संतोष कांडेसर (वय ७) हा मुलगा वाहून गेला. रविवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. करंजे येथे अग्रणी नदीच्या पुलावरून जाणारे शिराज बापू मुल्ला (वय ४६, रा. करंजे) हे दुचाकीसह वाहून गेले. बलवडी (खा.) येथे एक व्यक्ती अग्रणीतून वाहून गेली. त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तालुक्यातील मोरगाव येथे अग्रणीच्या पुलावर चारचाकी गाडी अडकली होती. पुराचे पाणी वाढल्याने यातील एक व्यक्ती वाहून गेली, तर इतर आठ जणांना वाचवण्यात यश आले.

वाचा:

तालुक्यातील बेवनूर येथे जनावरे चरायला घेऊन गेलेल्या शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. बाजीराव नारायण शिंदे (वय ६०) असे मृत शेतक-याचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील वाळूज येथे वीज पडून किरण महादेव देशमुख यांच्या दोन म्हशी दगावल्या. इस्लामपूर, आष्टा, कडेगाव, विटा, मिरज परिसरातही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. लहान पुलांवर दोन ते तीन फूट पाणी आल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष आणि डाळींब बागांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन आणि भुईमुगाचे नुकसान झाले. कडेगाव, खानापूर परिसरात काही घरांचीही पडझड झाली आहे.

वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरू

जिल्ह्यात काल चौघे वाहून गेले. यापैकी लेंगरे येथील सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरूच आहे. पावसाचा जोर आणि अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. सोमवारी पहाटेपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र शोध लागलेला नाही. जिल्ह्यात आणखी दोन दिवस परतीच्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here