मुंबई: फेसबुक पेजवरून गृहमंत्री आणि महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी सोमवारी येथून अटक केली आहे. उस्मानाबाद येथे एका कंपनीत काम करणारा हा तरुण पुणे येथे वास्तव्यास होता. ( Offensive On Home Minister Latest News )

वाचा:

कालावधीत सोशल मीडियावर भावना भडकवणारे संदेश टाकणे, खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे इंटरनेटवरील या घडामोडींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. अशातच आप्पा केसरजवळगेकर या नावाच्या प्रोफाइलवरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि एका वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधी विरुद्ध अश्लील पोस्ट टाकण्यात आल्याचे आढळले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

वाचा:

पोलिसांचा तपास सुरू असतानाच ही पोस्ट टाकणारा तरुण नवी मुंबई आणि पुणे परिसरात असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट ६ चे सहायक निरिक्षक अनिल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे या तरुणाला पुण्याच्या चिखलीतून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हे कृत्य का केले? यामागील नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here