वाचा:
मुंबईतील वीज पुरवठा सोमवारी सकाळी १० वाजता ठप्प झाला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत अन्य भागांतील वीज पुरवठा पूर्ववत झाला मात्र मुलुंड, भांडुप भागात वीज पुरवठा ठप्पच होता. परिणामी या भागातील रुग्णालयांना केवळ जनरेटरचाच आधार होता. त्यात अॅपेक्स रुग्णालयातही जनरेटर सुरू करण्यात आला होता. मात्र तो बरेच तास चालवावा लागल्याने व अधिक गरम झाल्याने अनर्थ घडला. जनरेटरने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. या माहितीला अग्निशमन दलाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.
वाचा:
मुलुंड पश्चिमेकडे वीणानगरमध्ये असून आगीबाबत माहिती मिळताच अग्नशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर युद्धपातळीवर मदतकार्य करत सर्व रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात ४० रुग्ण होते. त्या सर्वांना जवळच्या , आणि आस्था या तीन रुग्णालयांत हलवण्यात आले. दुसरीकडे आग अवघ्या १५ मिनिटांतच नियंत्रणात आणण्यात दलाने यश मिळवले.
वाचा:
दरम्यान, अॅपेक्स रुग्णालयातून जे ४० रुग्ण अन्य रुग्णालयात हलवण्यात आले होते त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाला नसता तर ही दुर्घटना घडली नसती व संबंधित रुग्णाचे प्राण वाचू शकले असते, असेही बोलले जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times