मुंबईः आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षानं कडाडून विरोध केला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांची सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादीनंही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी ही कारशेड आरेमध्येच असणे गरजेचं असल्याचं म्हटलं होतं, यावरही यांनी भाष्य केलं आहे.

‘आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टीका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला दिलसे पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असं म्हणत रोहित पवारांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे?

अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आरेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार. आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम,’ असं ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here