म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: तालुक्यातील गणोरी येथे एका अल्पवयीन मुलीची गावातील चार तरुणांनी महिनाभरापूर्वी छेड काढली. त्यानंतरही वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (नऊ ऑक्टोबर ) विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

आकाश भादवे, आकाश उबाळे, नवनाथ भादवे, संदीप भादवे (सर्व रा. गणोरी), अशी छेड काढणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणोरी येथील एका अल्पवयीन मुलीची आकाश उबाळे याने महिनाभरापूर्वी छेड काढली होती. मात्र मुलीने ही घटना घरी सांगितली नाही. त्यानंतर आकाश उबाळेसह आकाश भादवे, नवनाथ भादवे, संदीप भादवे हे या मुलीला सतत त्रास देत होते. त्याला कंटाळून या मुलीने विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता पोलिसांनी जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. या चारही आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ अ, ४५२, ३४ भादंवि सहकलम १२१७ बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here