मुंबईः महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपनं राज्यात आंदोलन सुरु केलं आहे. मंदिर प्रवेशासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरांसमोर मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते जमले आहे. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

करोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम असून, इतक्यात मंदिरे खुली करण्यात येणार नाहीत, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबाद येथे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोस्टरबाजीही करण्यात आली असून मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, असं या पोस्टरवर लिहण्यात आले आहेत.

मुंबईत सिद्धीविनायक मंदिराच्याबाहेर भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. तर, सांगलीत मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे गणपती मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले. घंटानाद करत भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याची मागणी करत ‘दार उघडा, उद्धवा दार उघडा’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here