वाचा:
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील ‘लेटरवॉर’वर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने राज्यपालांच्या पत्राचं जोरदार समर्थन करत उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे तर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर हा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात राज्यपाल हस्तक्षेप करत असतील तर राज्यपालांना सुस्पष्ट आणि विनम्र भाषेत कसे उत्तर द्यावे, याचे हे पत्र म्हणजे आदर्श उदाहरण असल्याची प्रतिक्रिया प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
वाचा:
या ‘लेटरवॉर’वर राजकीय प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभावीकच होते मात्र आता अभिनेत्री कंगना राणावतने यात उडी घेतल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कंगनाने पुन्हा एकदा या निमित्ताने ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारविषयी बोलताना कंगनाचा तोल सुटल्याचे परत दिसले. ‘गुंडा सरकारला राज्यपाल सरांनी जाब विचारल्याचे पाहून मला बरे वाटले’, असे नमूद करत कंगनाने अत्यंत असभ्य भाषेत महाराष्ट्र सरकारचा आणि शिवसेनेचा उल्लेख केला आहे.
वाचा:
‘महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडायला परवानगी दिली मात्र अगदी सुनियोजितपणे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे’, असे ट्वीट कंगनाने केले असून यावरून नवा वाद उभा ठाकला आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात आधीच टोकाचा संघर्ष झडला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि नंतर कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमणावर पालिकेने केलेली कारवाई यावरून कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. तेव्हा महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी कंगनाला तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांचा झालेला एकेरी उल्लेख महाराष्ट्रात सर्वांनाच खटकला होता. हा वाद पूर्ण शमला नसतान आता पुन्हा एकदा कंगनाची जीभ घसरल्याने राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यातील लेटरवॉर वेगळंच वळण घेण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times