म. टा. प्रतिनिधी, : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पैसे घेण्यासाठी मुंबईतून आलेल्या एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे तीन जणांनी केले. त्याला सोडवण्यासाठी ३५ लाखांची खंडणीही मागण्यात आली. तीन दिवसानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका करत आरोपींना अटक केली. शनिवारी येथे ही घटना घडली असून, मंगळवारी पहाटे मॅनेजरची सुटका करण्यात आली. आरोपींकडून दोन आलिशान कार, दुचाकी, सात मोबाइल असा ६१ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

राहुल तिवारी (वय २७, सध्या रा. सिल्व्हर सेव्हन हॉटेल, आकुर्डी) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशुतोष अशोक कदम (वय २८, रा. रहाटणी), राहुल बसवराज माळगे (वय २२, रा. काळेवाडी), तुळशीराम नथुराम पोकळे (वय ३४, रा. काळेवाडी) या तिघांना अटक करण्यात आली असून, अमर अशोक कदम, विकी गरूड, उमेश मोरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

राजकुमार मनोहरसिंग (वय ४३, रा. लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, कांदिवली, ) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोहरसिंग शेअर बाजारात ब्रोकर म्हणून काम करतात. तर आरोपींनी त्यांच्यामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक गणेश जवंदवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहरसिंग हे आपले मॅनेजर राहुल तिवारी यांच्यासह आकुर्डीतील सिल्व्हर सेव्हन या हॉटेलमध्ये शेअर बाजाराशी संबंधित कामानिमित्त राहण्यासाठी आले होते. त्यांचा मॅनेजर तिवारी हा काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणुकीसाठी ५ लाख रुपये आणण्यासाठी गेला होता. पैसे आणण्यासाठी गेल्यानंतर राहुलचा मनोहरसिंग यांना फोन आला. मी ५ लाख रुपये आणले आहेत, मात्र मला वाचवा, असे म्हणून त्यांनी फोन कट केला. अर्ध्या तासाने मनोहरसिंग यांनी राहुल यांच्या मोबाइलवर फोन केला. तेव्हा तो फोन अमर कदम याने उचलला. राहुलला सोडायचे असेल तर ३५ लाख रुपये द्या, असे म्हणत त्याने खंडणी मागितली.

दोन तासांनी पुन्हा राहुल याच्या फोनवरून मनोहरसिंग यांना फोन आला. लगेच पैसे द्या, नाहीतर राहुलला मारून टाकू, अशी धमकी त्याने फोनवरून दिली. रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा राहुल यांच्या फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी राहुल बोलला की पैशाची व्यवस्था झाली आहे का, हे लोक मला मारून टाकतील. त्यानंतर अमर कदम आणि शशांक कदम हे बोलू लागले. तेव्हा मनोहरसिंग यांनी पैशाची व्यवस्था करीत असल्याचे त्यांना सांगितले. सोमवारी (१२ ऑक्टोबर) पुन्हा आरोपींचा फोन आला व त्यांनी पैशांची व्यवस्था झाली का, अशी विचारणा केली. मात्र बॅंकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे मनोहरसिंग यांनी सांगितले. माझी माणसे पाठवतो त्यांना पैसे देऊन टाका, असे आरोपींनी सांगितले. खंडणीसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर मनोहरसिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. घटनेनंतर दोन दिवसांनी मनोहरसिंग हे पोलिसांकडे गेले. त्यामुळे आरोपी नेमके कुठे आहेत. त्यांनी राहुल याला शहरात किंवा अन्यत्र कोठे ठेवले आहे हे शोधण्यात अनेक अडचणी पोलिसांना आल्या. तांत्रिक माहितीसह संशयित आरोपी कोठे राहतात याचा ठावठिकाणा शोधत निगडी पोलिसांसह, खंडणी दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या चार पथकांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे सापळा रचून डांगे चौक परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना पकडल्याचे त्यांच्या साथीदारांना समजल्याने त्यांनी राहुल याला सोडून दिले आणि पळ काढला. आरोपींनी राहुल याला गाहुंजे येथील फ्लॅटवर नग्न अवस्थेत बांधून ठेऊन केली. निगडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here