मुंबई : हिंदी बिग बॉसच्या १४ व्या पर्वात आठवड्याच्या सुरुवातीलाच गोंधळ सुरू पाहायला मिळाला. घरातील पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. या खेळातून सारा गुरपाल बेघर झाली आहे. तूफानी सिनिअर सिद्धार्थ शुक्लानंच साराला घराबाहेर केलं आहे. तर बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत.

”मध्ये बर्‍याचदा कॅमेऱ्यासमोर तू-तू-मैं-मैं आणि अनेक आरोप- प्रत्यारोप होताना दिसतात. पण प्रत्येकवेळा अस होतंच असं नाही. लोकांमध्ये मैत्री- प्रेमही दिसून येतं.
बिग बॉसच्या घरात आता प्यारवाली लव्हस्टोरी दिसणार आहे. या लव्हस्टोरीत असणार आहेत पवित्रा पूनिया आणि एजाज खान. खरं तर एजाजला सारा गुरपाल आवडू लागली होती. पण अचानक ती बेघर झाली. यानंतर बिग बॉसच्या घरातील मंडळी एकमेकांसोबत मैत्री करताना दिसत आहेत. पवित्रा पूनिया देखील घरातल्यांसोबत खेळीमेळीने राहाताना दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या भागात पवित्रा एजाजला किस करताना दिसून आली होती. तर अनेकदा तिनं त्याला मिठी मारल्याचंही दिसून आलं. एजाज किचनमध्ये काम करत असाताना पवित्रानं त्याला मागून जाऊन मिठी मारली. एजाजनं मात्र यावर काही प्रतिक्रिया दिली नसली तरी भविष्यात दोघांमध्ये खास नातं तयार होणार असल्यांचं बिग बॉसचे प्रेक्षक म्हणत आहेत.

यापुढं आता सीनिअर्स फ्रेशर्सबाबत अधिक सक्तीची भूमिका घेताना दिसणार आहेत. एवढंच नाही तर ते वेगवेगळ्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देतानाही दिसणार आहेत. यात हास्यास्पद टास्कपासून ते जिम टास्कपर्यंत साऱ्या गोष्टींचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here