मुंबई: राज्यात झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहचले आहे. आजही सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. ( Latest Updates )

वाचा:

आज दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या जवळपास दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता () ८४.३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली.

वाचा:

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह ( १९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here