आबुधाबी, : महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण आजच्या सामन्यात धोनी चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. धोनी भडकल्याचे पाहिल्यावर पंचांनी आपला निर्णय बदलल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय, पाहा…

हैदराबादला या सामन्यात विजयासाठी १२ चेंडूंमध्ये २७ धावांची गरज होती. त्यावेळी १९ व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. चेन्नईकडून १९वे षटक वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर टाकत होता. या षटकातील दुसरा चेंडू पंच पॉल रायफल यांनी वाईड असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर तिसरा चेंडू शार्दुलने ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर टाकला. त्यावेळी पंच पुन्हा एकदा वाईड बॉल द्यायला जात होते. पण त्यावेळी ते थांबल्याचे पाहायला मिळाले.

या चेंडूनंतर पंच वाईड बॉल देणार एवढ्यातच शार्दुल नाखूष असल्याचे त्यांना दिसले. त्याचबरोबर यष्ट्यांमागून धोनीही पुढे धावत आला आणि यावेळी धोनीचा पारा थोडा चढलेला पाहायला मिळाला. धोनीने दोन्ही हातांनी इशारा करत हा वाईड चेंडू कसा काय ठरू शकतो, असे विचारले. त्यावेळी जे पंच वाईड चेंडू देण्यासाठी सरसावले होते. त्यांनी आपला निर्णयच बदलल्याचे पाहायला मिळाले. धोनीसारखा अनुभवी खेळाडू भडकल्याचे पाहिल्यावर पंच पॉल रायफल यांनी आपला निर्णय बदलला आणि हा चेंडू निर्धाव गेला.

एकेकाळी एकामागून एक विजय महेंद्रसिंग धोनी मिळवत असल्याचे पाहायला मिळाले होते. पण या आयपीएलमध्ये मात्र धोनीवर विजय रुसल्याचेच पाहायला मिळाले होते. पण आजच्या सामन्यात धोनीला अखेर विजय गवसल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील चेन्नईचा हा तिसरा विजय ठरला. आजच्या सामन्यात चेन्नईने हैदराबादपुढे विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या केन विल्यम्सनने अर्धशतक झळकावले होते. पण केन बाद झाल्यावर चेन्नईचा विजय सुकर झाला. त्यामुळे या सामन्याच चेन्नईना हैदराबादवर मात करता आली. आजच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत दोन गुण कमावले. या दोन गुणांसह चेन्नईने गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे. चेन्नईचे आता सहा गुण झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here