जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ अॅप डाउनलोड करा
‘वीज पडणाची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ हे अॅाप डाउनलोड करावे; तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ०२०-२६१२३३७१ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कटारे यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times