पण नंतर या घटनेचा व्हिडिओ ट्विटरसह अन्य सोशल साइटवर व्हायरल झाला. अनेक युजर्सनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या. रामदेव बाबांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं काही म्हटलंय. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मथुरेच्या महावनमधील रमणरेती आश्रमात रामदेव बाबा हत्तीवर बसून योग सराव करत होते. हत्तीच्या हालचालीमुळे बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यापूर्वी रामदेव बाबा एकदा निवडणुकीच्या व्यासपीठावरून खाली पडले होते.
इजा झालेली नाही
काही महिन्यांपूर्वी सायकलवरून पडल्याचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंगळवारच्या घटनेनंतर रामदेव बाबांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ट्विट अनेक युजर्सनी केलं. मात्र, या घटनेत रामदेव बाबा यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
२२ सेकंदाचा व्हिडिओ झाला व्हायरल
व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोमवारचा असल्याचं सांगितलं जातंय. शरणानंद आश्रम रामनरेती येथे रामदेव बाबा संतांना योग शिकवत होते, त्यावेळी बाबांनी हत्तीवर बसून योग मुद्रा देखील केली. त्याचाच एक व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. हा व्हिडिओ २२ सेकंदांचा आहे. यात रामदेव बाबा हत्तीवर योग मुद्रा करताना दिसून येत आहेत. अचानक हत्ती हालला आणि बाबा हत्तीवरून खाली पडले. यानंतर ते लगेच उठून चालताना दिसून आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times