नवी दिल्लीः करोना संकटामुळे मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( ) भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी दिलीय. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पुढच्या वर्षी चांगली असेल, असा अंदाज नाणेनिधीने व्यक्त केला आहे.

सध्याचं आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. २०२१ मध्ये सर्व काही ठीक होईल, अशी अपेक्षा आहे. ( IMF ) च्या नव्या अंदाजातून या गोष्टी समोर आलीय. या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ९.६ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज गेल्या आठवड्यात जागतिक बँकेनं वर्तवला होता. या व्यतिरिक्त मूडीजसह अनेक बड्या रेटिंग एजन्सी आधीच जीडीपीमध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.

१०.३ टक्के घसरण

करोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला असून या वर्षात १०.३ टक्क्यांनी जीडीपी घसरेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला आहे. २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८.८ टक्क्यांनी वाढेल, अशी आशा आयएमएफ व्यक्त केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था चीनला मागे टाकून वेगाने वाढणार्‍या उभरत्या अर्थव्यवस्थेचा दर्जा परत मिळवेल. २०२१ मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेचा ८.२ टक्के वाढीचा अंदाज आहे. यामुळे जीडीपी वाढीच्या अंदाजातील सुधारणा ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलंय. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर हा ४.२ टक्के होता.

जागतिक अर्थव्यवस्थेत ४.४ टक्के घट

चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल. त्याचवेळी २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांच्या भक्कम वाढीसह ती पुढे जाईल, असा अंदा आयएमएफचा ताजा अहवाल आहे. जगातील बड्या अर्थव्यवस्थांमध्ये चीन हा एकमेव देश असेल ज्याच्या आर्थिक विकादरात यदांच्या वर्षात १.९ टक्के वाढ नोंदवली, असंही आयएमएफने म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here