हैदराबाद: तेलंगणची राजधानी हैदराबादसह अनेक ठिकाणी सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे () स्थिती गंभीर बनली आहे. हैदराबादमधील रस्ते जलमय झाले आहेत. काही रुग्णालयांमध्ये पाणी भरले असून अनेक ठिकाणी कार रस्त्यांवरून वाहून गेल्या. याबरोबरच शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बचावकार्य हाती घेण्यात आली असून ते अथकपणे सुरू आहे.
तेलंगणच्या अनेक भागांमध्ये पडत असून मुख्यमंत्र्यांनी अलर्ट जारी केला आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादच्या अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये २० सेंटीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
बोटींच्या सहाय्याने लोकांचा बचाव केला
हैदराबादमधील अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात लोक अडकले होते. त्यांच्या बचावासाठी बोटींचा वापर करावा लागला. यावरून हैदराबादेत पूरसदृश्य स्थितीच्या भयानकतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. राज्यातील आपत्ती निवारण दलाने आणि अग्निशमन दलाने चौकी परिसरात सुरू करून लोकांना बाहेर काढले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times