मुंबई: माफिया डॉन याला इंदिरा भेटायला जात असत या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे वादंग उठले असताना, करीम लाला याच्या नातवाने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. करीम लाला यांच्या कार्यालयात यांच्या भेटीची छायाचित्रे तर आहेतच, मात्र, त्या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि शिवसेनाप्रमुख यांचेही करीम लालासोबत छायाचित्रे आहेत, अशी माहिती करीम लालाचा नातू याने दिली आहे.

इंदिरा गांधी करीम लाला यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जात असत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी राऊत यांच्या या वक्तव्याबाबत नाराजीही व्यक्त केली. संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, तसेच राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांकडून केले जात आहे. अशात करीम लाला याच्या नातवाने या वादाच्या विषयाशी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जोडल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

संजय राऊत यांनी वक्तव्य घेतले मागे

माझ्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना किंवा गांधी कुटुंबातील सदस्यांना वाईट वाटले असेल, मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधी यांच्या चारित्र्याला धक्का पोहोचला असेल, किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे स्पष्ट करत राऊत यांनी या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here