मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री हे नाव मराठी मनासाठी काही नवं नाही. अनेक दशकांपासून त्या मराठी मनाचं मनोरंजन करत आहे. फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. मात्र सध्या त्या एका दुर्गम आजाराने त्रस्त आहे. सीमा देव यांचा मुलगा आणि अभिनेते यांनी स्वतः सोशल मीडियावर यासंबंधीची माहिती दिली.

अजिंक्य यांनी ट्वीट करत त्यांची आई या दुर्गम आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं. ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘माझी आई सीमा देव या अल्झायमर या आजाराशी लढत आहे. संपूर्ण देव कुटुंब ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने जे तिच्यावर भरभरून प्रेम केलं त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना कराव्यात.’ अजिंक्य यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी कमेन्टमध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहायला सुरुवात केली. यात बहुतांश लोकांनी सीमा देव यांना लवकरात लवकर बरं वाटावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं याची प्रार्थना केली.

अभिनेत्री सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित जगाच्या पाठीवर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यासोबतच सुवासिनी, आनंद अशा नावाजलेल्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा उमटवला.

अल्झायमर म्हणजे नक्की काय-

अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here