म. टा. प्रतिनिधी, जळगाव: भाजपचे नेते आणि माजी मंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील जामनेर येथे साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा काल, मंगळवारी दुपारी पार पडला. या सोहळ्यापूर्वी अनोळखी व्यक्तीने गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाइलवर फोन करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर, हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची दिली. त्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असतानाच धमकीचा फोन आला होता. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार होते. लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाइलवर दुपारी साधारण एक वाजताच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने हिंदी भाषेमध्ये ‘गिरीश महाजन को बोल दे, एक करोड भेज दे, नही तो हम हॉस्पिटल बम्ब से उडा देंगे’. एवढे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळात म्हणजेच ३ वाजून ३७ मिनिटांनी तायडे यांच्या मोबाइलवर एक मेसेज केला. यात हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ‘पाँच बजे तक 1 करोड भेज दे, महाजनको बोल दे, नही तो बहोत बडा ब्लास्ट हो जायेगा, मालेगाव मे मेरे आदमी खडे हैं, नही तो तुम्हारी मर्जी, मैं मेरा काम कर के निकल जाऊंगा’, अशा आशयाचा तो मेसेज होता. या प्रकारानंतर दीपक तायडे यांनी कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी कार्यक्रमस्थळी कसून तपासणी केली.

या प्रकरणी जामनेर पोलिसांत दीपक तायडे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप नाईक करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here