म. टा. खास प्रतिनिधी, : करोना काळात घराबाहेर पडतात म्हणून नातवाने आजोबाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित आरोपीने आजोबाचा मृतदेह चारचाकी वाहनातून ओढा शिवारातील नाल्यात फेकून दिला. ही बाब रविवारी उघडकीस आली.

रघुनाथ श्रावण बेंडकुळे (७०, रा. धोंडेगाव) असे मयत आजोबांचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी किरण निवृत्ती बेंडकुळे (२३) यास अटक केली. चिकटपट्टीने बांधलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात एक एक धागा जोडून पोलिस संशयित किरणपर्यंत पोहचले. वृद्ध रघुनाथ बेंडकुळे सतत घराबाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते करोनाकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप करीत किरण त्यांना लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवायचा. दोघांमध्ये वाद वाढला अन् रघुनाथ बेंडकुळे यांनी हरसूल पोलिस ठाणे गाठले. किरणविरुद्ध तोंडी तक्रार केली. पोलिसांनीही संशयिताला समजून सांगितले. मात्र, या प्रकरणाचा किरणला राग आला. रविवारी त्याने झोपलेल्या आजोबांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली. हातपायाला लोखंडी साखळी बांधले आणि ओमनीत (एमएच १५ इबी ३९१९) टाकले. त्यानंतर आडगाव शिवारातील ओढा गावाजवळील नाल्यात फेकून दिले.

या प्रकरणाची दुसऱ्याच दिवशी आडगाव पोलिसांना खबर मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर आणि पथकाने तपास केला. मयताची ओळख पटताच पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा किरणच्या दिशेने वळवली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here