म. टा. प्रतिनिधी, : परिसरातील जंगलात एका १३ दिवसांच्या बाळाला आई-वडिलांनी खड्डा खोदून पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठिमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या परिसरात जंगल आहे. तेथे खड्डा खोदून त्या बाळाला आई-वडिलांनी पुरले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वडगाव चौकी व सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा खड्डा खोदण्यासाठी तहसीलदारांची परवानगी लागते. यामुळे पोलीस आता तहसीलदारांकडे गेले आहेत. तहसील कार्यालयातील अधिकारी आल्यानंतर खोदकाम सुरू करण्यात येणार आहे. हे बाळ अपंग असल्यामुळे त्याला पुरल्याची शक्यता असून, आई-वडिलांचा शोध घेण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times