पुणे: ‘राज्यात भीषण परिस्थिती आहे. कोण काय बोलतोय, काहीच कळत नाही. त्यामुळं राज्यातील महाआघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडेल,’ असं भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी वर्तवलं आहे.

भाजप नेता जयभगवान गोयल यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी केलेली तुलना आणि इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सध्या राजकारण तापलं आहे. गोयल यांच्या पुस्तकावरून शिवसेनेनं भाजपला घेरलं होतं. या प्रकरणी बॅकफूटवर गेलेल्या भाजपला संजय राऊत यांच्या इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळं आयतीच संधी मिळाली. पाटील यांनी ही संधी साधत शिवसेनेवर पलटवार केला आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबद्दलचं वक्तव्य अशोभनीय आणि निंदनीय आहे. त्यात तथ्य असल्यास चौकशी व्हायला हवी आणि तसं नसल्यास काँग्रेसनं गांभीर्यानं विचार करावा, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचा:

मोदी व शिवाजी महाराज यांच्या तुलनेच्या वादावरूनही पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘२०१२ मध्ये संजय राऊत यांनी स्वत: बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली होती. कोणत्याही पक्षाने महापुरुष आणि राजकीय व्यक्तींची तुलना करूच नये, असं ते म्हणाले.

वाचा:

वाचा:

चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त झाल्यामुळं महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, असा टोला राऊत यांनी हाणला होता. त्यावर, राऊत यांनी मूळ वक्तव्यावर बोलावं,’ असं पाटील म्हणाले.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here