मुंबईः मुंबईच्या महापौर यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांविरोधातल आंदोलनाचा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. महापालिकेच्या वरळी येथील जी/दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त तसेच सहायक आयुक्त उपस्थित न राहिल्याने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांसह पालिका मुख्यालयात आंदोलन केलं आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवेसेनेला आंदोलन करावं लागल्यानं नामुष्की ओढवली आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना बुधवारपासून सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता जी/ दक्षिण प्रभाग समितीची निवडणूक पार पडली. या प्रभागात एकमेव शिवसेनेचा अर्ज प्राप्त झाल्याने नगरसेवक दत्ता नरवणकर यांची बिनविरोध निवड झाली. मात्र निवडणुकीची औपचारिकता पार पाडण्यासाठी या प्रक्रियेला सुरुवात झाली तरी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त व सहाय्यक आयुक्त उपस्थित राहिले नाही. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांसह महापौरांनी याचा तीव्र निषेध नोंदवला. तर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळ पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल मंत्रालयात परत जा, अशी मागणीही शिवसेना नेत्यांनी केली आहे.

या, प्रकरणी वाद वाढत असतानाच आयुक्त यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन करून माफी मागितली आहे. महापौरांनीही या वादावर पडदा टाकत हा विषय इथेच थांबवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here