१५ ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा टप्प्याटप्यानं सुरु होणार आहे. त्यासाठी नगरविकास विभागानं जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रंथालये, आठवडी बाजारही सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबरोबरच, उद्यापासून कोणत्या सेवा सुरू होणार व कोणत्या सेवा तूर्तास बंदचं राहणार आहेत जाणून घ्या.
या सेवा सुरू राहणार
मेट्रो, ग्रंथालय, गार्डन, उद्याने उद्यापासून सुरू होणार
व्यावसायिक प्रदर्शने भरवण्यास परवानगी
कंटेन्मेंट झोनवगळता इतर ठिकाणी स्थानिक आठवडी बाजार, गुरांचा बाजार उघडण्यास परवानगी
ऑनलाइन शिक्षणाला परवानगी
केंद्रानं परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार
दुकानं सकाळी ९ ते रात्री ९पर्यंत सुरू राहू शकतात
शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी
या सेवा बंदच राहणार
धार्मिक स्थळे, मंदिरे तूर्तास बंदच राहणार
शाळा, महाविद्यालये ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार
सिनेमा हॉल, थिएटर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच
लग्न समारंभासाठी यापूर्वी घातलेल्या अटी कायम
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times