म. टा. प्रतिनिधी । अहमदनगर

‘ज्येष्ठ नेते हे भाजपमधून जवळपास बाजूलाच पडले आहेत. आता केवळ फक्त मुहूर्त ठरवायचा की, इकडे का तिकडे कुठे जायचे,’ असे सांगत शिवसेना नेते माजी मंत्री यांनी खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ दिले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे हे पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर, या विषयावर बोलताना आज माजी मंत्री खोतकर यांनी खडसे यांचा केवळ पक्ष प्रवेशाचा मुहूर्त बाकी असल्याची सांगितले. ते आज नगरमध्ये बोलत होते.

वाचा:

एकनाथ खडसे यांचा स्वभाव बघता ते भाजप सोडतील का? असा प्रश्न खोतकर यांना विचारला असता ते म्हणाले, ‘भाजपमध्ये आता त्यांचे राहिले काय आहे? ते जवळपास बाजूला पडले आहेत. फक्त आता इकडे की तिकडे कुठे जायचे? हा मुहूर्त त्यांचा ठरायचा आहे. खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांना त्यांचे भलेबुरे कळते. त्यामुळे ते योग्य पक्षात जातील, असे मला वाटते. त्यावर खोतकर यांना खडसे शिवसेनेत येतील का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘हा निर्णय शेवटी त्यांचा आहे. आपण काही म्हणलो तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे.’

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here