मुंबईः राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करून १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं १९ ऑक्टोबरपासून मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना मेट्रो सेवेसाठी तूर्तास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.

राज्यात आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होत असताना, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनतर्गंत अनेक सेवांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज नव्याने जारी केलेल्या नियमावलीत १५ ऑक्टोबरपासून मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जरी उद्यापासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, मेट्रो प्रशासनानं १९ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता पहिली मेट्रो धावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसं ट्विटचं मेट्रोनं केलं आहे.

करोनाचे संकट असल्यानं मेट्रोकडूनही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मेट्रो सुरू होण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रोकडून स्वच्छता व इतर गोष्टींची तपासणी करण्यात येणार असून मेट्रोच्या ट्रायल रन घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सोमवारी १९ ऑक्टोबरला मेट्रो दाखल होणार आहे.

दरम्यान, देशातील अन्य शहरांतील मेट्रोसेवा केंद्रांच्या परवानगीनंतर सप्टेंबरमहिन्यातच सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, मेट्रो सेवेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्य सरकारने जरी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here