मुंबईः मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील कांदिवली भागातील असाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबईतील कांदिवली भागातील एका उंच इमारतीवर एक तरुण काही कसरती करताना दिसत आहे. या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतंय की इमारतीच्या एका कठड्यावर स्टंट हा तरुण स्टंट करताना दिसत आहे. असे जीवघेणे स्टंट करताना या तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. स्टंटबाजी संपल्यानंतर एक गाणंदेखील बॅकग्राऊडला वाजत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण असे खतरनाक स्ंटट करताना पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, तरुणाचा हा जीवघेणा स्टंट सोशल मीडीयावर चांगलाचं व्हायरल होत असून हा व्हिडिओ कांदिवली परिसरातील असल्याचे म्हटले जात आहे. काही नेटकऱ्यांनी पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर, पोलिसही असे जीवघेणे स्ंटट करणाऱ्या या तरुणाचा शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here