‘मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या,’ असं वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळं अखेर राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.
वाचा:
वाचा:
या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळं आम्ही नाराज होतो आणि आहोत. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली आहे. राऊत यांनी वक्तव्य मागे घेतल्यानं आता विषय संपलाय. मात्र, यापुढच्या काळात आम्ही हे खपवून घेणार नाही,’ असं थोरात म्हणाले.
वाचा:
राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपनं काँग्रेसला घेरलं होतं. काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का? काँग्रेसला अंडरवर्ल्डकडून पैसा यायचा का? याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं, अशी मागणी भाजपनं केली होती. त्याबाबत विचारलं असता, ‘मुळात जे वक्तव्यच चुकीचं आहे. त्यावर स्पष्टीकरण कसलं द्यायचं,’ असं थोरात म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत? पाहा व्हिडिओ
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times