मुंबई: राज्यात अनेक भागांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. , , , सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर आहे. पुण्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. जाणून घ्या पावसाचे ताजे अपडेट्स…

Maharashtra Rains Live Updates…

– पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागाला पावसाचा मोठा तडाखा. अनेक इमारतींना पाण्याचा वेढा.

– सोलापूरमधील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग २ लाख क्युसेक पर्यंत वाढवला.

– पुणे: आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथके सज्ज. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती.

– शहर व उपनगरांत ढगांच्या गडगडाटाने पोटात भीतीचा गोळा. पावसाचा जोरही वाढला.

– पुणे: सिंहगड रस्ता विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आला. विश्रांती नगर चौक, संतोष हॉल, चौक वडगाव ब्रिज हायवे येथे दुभाजकावरून वाहतंय पाणी. वडगाव, धायरी, आनंदनगर, माणिक बाग या ठिकाणी प्रवास टाळा.

– पुणे: गुंजवणी धरण व घिसर परिसरात पावसाचा जोर वाढला. पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ. १६७६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवणार. गुंजवणी नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन.

– पुणे कॅम्प बंगलो नंबर १६, क्विन्स गार्डन परिसरातील घरांत पाणी शिरले. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे संपर्क क्रमांक ‘नॉट रिचेबल’.

– पुणे: आदिनाथ नगर, भोसरी येथे घरांमध्ये पाणी शिरले. पवना नदी काठ परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात

– पुणे: पानशेत धरणातून खडकवासला धरणात दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. जलसंपदा विभागाने दिली माहिती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here