मुंबई: शहर, उपनगर आणि जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर वाढला असून मुंबई रडारने टिपलेली ताजी दृष्ये लक्षात घेता संपूर्ण उत्तर कोकणवर अतिवृष्टीचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागानेही आधी जारी केलेला अॅलर्ट बदलून मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत आजसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. ( Latest Updates )

भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं ट्विट केलं आहे. ‘अत्यंत महत्त्वाचे’ असे नमूद करत त्यांनी मुंबई आणि ठाणेकरांना सतर्क केले आहे. आणि रडारने टिपलेले ताजे चित्र लक्षात घेता उत्तर कोकणसाठी आधी जो ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला होता त्यात बदल करण्यात येत आहे. आज मुंबई व ठाण्यासह संपर्ण उत्तर कोकणसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात येत आहे. नागरिकांनी या काळात जास्तीत जास्त सतर्कता बाळगावी, असे होसाळीकर यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. होसाळीकर यांनी सॅटेलाइट इमेजही या ट्वीटसोबत पोस्ट केली आहे.

सर्व यंत्रण झाल्या सतर्क

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री ११ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीनंतर उत्तर कोकणातील जवळपास सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबई व ठाणेकरांवर मोठे संकट घोंगावू लागले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई व ठाण्यात पालिकेचे आपत्कालीन विभाग स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here