BATमध्ये पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे दहशतवादी सीमेत घुसखोरी करून घात लावून जवानांवर हल्ला करतात आणि क्रूरतेसाठी ते कुख्यात आहेत. भ्याड हल्ला करणारे हे दहशतवादी शहीद जवानांच्या पार्थिवाशी क्रूर व्यवहार करण्यास कुख्यात आहेत. घाल लावून हल्ला करतात आणि शहीद जवानांच्या पार्थिवाची विटंबना करतात.
कुपवाडा येथील तंगधर गावात सकाळी सकाळी काही संशयास्पद हालचाली दिसून झाल्या. पण भारतीय जवनांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी वेळीच कारवाई केल्याने त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. परिसरात सर्च ऑपरेशन आणि पाळत ठेवली जात आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सकडून देण्यात आली.
चिनार कॉर्प्सने ट्विट करून माहिती दिलीय. ‘तंगधारमध्ये संशयित BAT (बॉर्डर अॅक्शन टीम) ची कुरापत उधळून लावण्यात आली आहे. सतर्क जवानांना सकाळी नियंत्रण रेषेवर फॉरवर्ड पोस्टजवळ ३-४ घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. सतर्क जवानांमुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात शोध मोहीम आणि पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे, असं ट्विटमधून सांगण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times