हैदराबादः तेलंगणमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमधील १५ जणांचा यात ( ) समावेश आहे. पावसामुळे हैदराबादचे अनेक भाग जलमय झाले आहेत. नागरिकांसाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हैदराबादमध्ये मंगळवारपासून तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी घुसलं आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केलं आहे. अशातच हैदराबादच्या शाहीननगर भागातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

बचाव पथकाच्या बोटीत ४ महिला आणि ५ लहान मुलं दिसून येत आहेत. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बोटीत पाणी शिरतं आणि बोट उलटते. या घटनेनंतर बोटीतील महिला आणि मुलं पाण्यात पडली. महिलांना मुलांना वाचवण्यात यश आलं. पण ही घटना किती धक्कादायक आहे, हे व्हिडिओत दिसून येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here