नवी दिल्लीः इंडियाने गणराज्य दिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी ‘रियल पब्लिक सेल’चे आयोजन केले आहे. रियलमीचा हा सेल अॅमेझॉन आणि रियलमीची अधिकृत वेबसाइट वर १९ जानेवारी पासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये कंपनी आपल्या सात स्मार्टफोनवर घसघशीत सुट देणार आहे. रियलमीचा हा २२ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये रियलमी ३, रियलमी ५, रियलमी ५ प्रो हे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

या सेलमध्ये रियलमी ३ चा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनवर एक हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन ६ हजार ९९९ रुपये होणार आहे. तर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या सेलमध्ये रियलमी ५ प्रो चा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन ११ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. म्हणजेच या फोनवर २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर २ हजार रुपये सूट दिल्यानंतर हा फोन १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तसेच रियलमी एक्स या फोनवर दोन हजार व रियलमी एक्सटी या फोनवर एक हजारांची सूट दिली जाणार आहे.

रियलमीच्या ‘रिपब्लिक डे सेल’ मध्ये रियलमी बड्स वर १०० रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर याची किंमत केवळ ४९९ रुपये इतकी झाली आहे. तसेच रियलमी बड्स वायरलेसला २०० रुपयांच्या डिस्काउंटसह १ हजार ५९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here