मुंबई/पुणे: परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. शहरात काल झालेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील विक्रम मोडले आहेत. आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी मुंबई, ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जाणून घ्या पावसाबद्दलचे सर्व अपडेट्स

Maharashtra Rain Live Updates:

पुण्यात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित. केबल तुटल्याने इंटरनेट बंद

गेल्या १२ तासांत नवी मुंबई, मुंबई शहरातील काही भागांत ७० ते १०० मिलीमीटरचा पाऊस

एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक लातूर व सोलापूरला रवाना

अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव भरला असून सांडव्यातून वाहणारे पाणी पुलावर आले आहे. त्यामुळे नगर ते वांबोरी वाहतूक विस्कळित

जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. साडेआठनतंर तुरळक पावसाला सुरुवात

कोल्हापूर: पाच दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर येथील कळंबा तलाव पुन्हा एकदा ओवरफ्लो

अहमदनगरमध्ये पहाटेपासून पावसाची उघडीप; मात्र नद्यांना पूर

पुण्यात मध्यरात्रीनंतर पावसाची विश्रांती. अनेक ठिकाणी पाणी ओसरले

मुंबई, ठाण्यात सकाळपासून पाऊस नाही. मात्र वातावरण ढगाळ

मुंबई, ठाण्यासाठी हवामान विभागानं जारी केला रेड अॅलर्ट. अतिवृष्टीचा इशारा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here