वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विविध गुंतवणुकांसाठी एसएमएस, व्हॉट्स ग्रुप तसेच ईमेलवर येणाऱ्या अनाहूत टिप्सपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा इशारा भांडवल बाजार नियंत्रक सेबीने (
) बुधवारी दिला. विशेषतः असे सल्ले भांडवल बाजारात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांबाबत, त्यांच्या समभागाच्या खरेदी-विक्रीबाबत तसेच एखाद्या कंपनीच्या आर्थिक वाटचालीबाबत येत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नये, असेही सेबीने स्पष्ट केले आहे.

कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यापूर्वी, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यापूर्वी तसेच भांडवल बाजाराशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भांडवल बाजाराचा, त्यातील चढउतारांचा अभ्यास गुंतवणूकदाराने करावा, अशी अपेक्षाही सेबीने व्यक्त केली आहे.

) मल्टी कॅप (Multi Cap Funds) म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक नियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता फंड कंपन्यांना किंवा व्यवस्थापकांना पूर्वीसारखे मल्टी कॅप योजनेतील निधी केवळ लार्जकॅपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येणार नाही. त्याऐवजी ७५ टक्के निधी हा इक्विटी आणि इक्विटीशी संबधित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवावा लागेल. याआधी ही मर्यादा ६५ टक्के होती. येत्या जानेवारीपासून ही नियमावली लागू होणार आहे. दरम्यान, या नव्या सुधारणेचे पडसाद सोमवारी बाजारात उमटतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here