मुंबई: पंढरपूर शहरातील चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून झालेल्या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री यांनी आज दिले आहेत. तसंच, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

पुण्यातील पावसाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत असे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचनाही अजित पवार यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here