जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत आमदार पाटील यांनी सांगितले, भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेतून पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा प्रयत्न केला. सरकारी निधीबरोबरच लोकनिधीचा त्यासाठी वापर केला. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. जमीनीतील पाणी पातळी वाढली. तरीही केवळ राजकीय सूडबुद्धीने त्याची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये लोकांचा सहभाग होता, म्ह्णून काय लोकांची पण चौकशी करणार का असा सवालही त्यांनी केला.
वाचा:
या योजनेतून बावीस हजार गावांत सहा लाखावर कामे झाली, त्यामध्ये केवळ १२० गावात चौकशी करून कॅगने अहवाल दिला आहे. नऊ हजार कोटीच्या योजनेत एक दोन गावात भ्रष्टाचार झाला असेलही. त्याला स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी जबाबदार आहेत, त्याची चौकशी करा. एका गावातील भ्रष्टाचाराला संपूर्ण सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. त्या गावातील योजनेची चौकशी करा, कारवाई करा असेही त्यांनी सांगितले.
वाचा:
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, आम्ही देव मानतो. ते पूर्वी देव मानायचे, आता ते मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही स्वताला हिंदूत्वादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता असा सवाल करून ते म्हणाले, आम्ही केवळ मंदिर उघडा म्हणत नाही, सर्व धार्मिक स्थळे उघडा ही आमची मागणी आहे. पण खासदार संजय राऊत हे फार विद्वान आहेत, सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का, असा टोला त्यांनी राऊत यांना मारला.
वाचा:
मेट्रोचे आरे कारशेडला पर्याय म्हणून आम्ही कंजूरमार्गाचा विचार केला होता, पण त्यासंदर्भात अनेक तक्रारी न्यायालयात असल्याने त्या निकालात निघायला वेळ लागेल म्ह्णून पर्याय मागे पडला. आरेत आधीच ४०० कोटी खर्च केले आहेत असे सांगून ते म्हणाले, सरकारच्या नव्या निर्णयाला आम्ही विरोध करणार आहोत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times