मुंबई: ‘बापाची पेंड’ हा मराठी भाषेत सहज वापरला जाणारा शब्द आहे. तो शब्द मी एके ठिकाणी वापरला. याचा अर्थ त्यातून कुणाचा बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढलेला नाही,’ असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

पुणे महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यावेळी ‘आम्हीही बाप आहोत’ असं ते म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ‘तुमच्या दिल्लीतील बापाला ‘बाप’ म्हणायला कुणी वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा करता,’ असा टोला शिंदे यांनी हाणला होता. चंद्रकांत पाटलांनीही त्यास उत्तर दिलं होतं. ‘आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. शेतकरी, कामगार आमचा मायबाप आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यांच्या हिताआड कोणी येत असेल तर आम्ही संघर्ष करणारच, असं पाटील म्हणाले होते. बापाचंच म्हणाल असाल तर दिल्लीत कोणाचा बाप आहे हे मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलं आहे,’ असं ते म्हणाले होते. त्यामुळं हे शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे होती. मात्र, पाटलांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

वाचा:

‘तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण मराठीत सहज म्हणतो. तसंच मी सुद्धा बोलून गेलो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा माझा हेतू नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. कुणाचा बाप काढण्याची माझी संस्कृती नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे त्यांना समजायला हवं. त्यावरून एकदम अंगावर येण्याची गरज नाही,’ असं पाटील म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here