‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे धर्मनिरपेक्ष आहेत का? हे आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विचारलं पाहिजं. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, राज्यातील मंदिरं बंद आम्हालाही ठेवायची नाहीत, पण लोकांचा जीव वाचवणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘घटना असं सांगते की पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल ही पदं धर्मनिरपेक्ष असतात. तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे. पण, आपला देश, आपली राज्य ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे चालतात. जी राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे,’ असंही संजय राऊत म्हणाले आहे.
काय आहे वाद?
राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुद्दा आता जोर धरु लागला आहे. दरम्यान, यावरूनच आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ‘लेटरवॉर’ही रंगलं आहे. राज्य सरकार मंदिरं भाविकांसाठी का खुली करत नाहीत, असा सवाल करतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाचीही आठवण करुन दिली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्र लिहत सडेतोड उत्तर दिलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times