वाचा:
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र व्हर्च्युअल सभेत चव्हाण बोलत होते. कोल्हापुरातील कमिटीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री , राज्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाचा:
केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर चौफेर टीका करताना चव्हाण म्हणाले, अनेक वर्षांत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताची कृषी यंत्रणा उभी केली होती. ती सहा वर्षांत मोदी सरकारने मोडित काढली. शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायदा मंजूर केला. सर्व बाबतीत या सरकारला अपयश आले आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशावेळी अंबानी आणि अदानी या भांडवलदार मित्रांना कृषीव्यवस्थाच बहाल करण्याचा मोदींचा डाव आहे.
वाचा:
हमीभाव दुप्पट करतो, सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, अशा घोषणा पंतप्रधान यांनी केल्या. पण प्रत्यक्षात काय केले हे ते सांगत नाहीत. उलट हमीभाव देता येत नाही असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. साठाबंदी उठवून काळाबाजाराला सूट दिली, बाजार समितीची यंत्रणा मोडित काढण्याचा त्यांचा डाव आहे. हा काळा कायदा फेटाळून लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, तळागाळातील शेतकऱ्यांनी याविरोधात उठाव करावा असेही ते म्हणाले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, देवीदास बन्साळी हे उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times