बलिया पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. घटनास्थळी पोलिस दल उपस्थित आहेत. मृताचे शवविच्छेदन केले जात आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांकडे गुंडगिरीचा परवाना देण्यात आला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. राज्यकर्तेच गुन्हेगार असतील, कायदा गुंडांचा गुलाम असेल तिथे लोकशाही पायदळी तुडवणं म्हणजे राजधर्म बनतो, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला.
सत्ताधारीच कायदा व सुव्यवस्थेला उघडपणे आव्हान देत आहेत. बलियामध्ये कायदा व सुव्यवस्थेला थप्पड मारणारी एक भयानक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याने जय प्रकाश पाल या व्यक्तीची उपविभागीय अधिकारी आणि सीओसमोर गोळी घालून हत्या केलीय. यानंतर पोलिसांसमोर भाजप नेते फरार झाले, असा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
सपा आणि कॉंग्रेसच्या आरोपांना बलियाचे भाजप जिल्हाध्यक्ष जय प्रकाश शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोपी धीरेंद्र सिंह हे भाजपच्या कोणत्याही पदावर नाहीत, असं शहा म्हणाले. तर आरोपी धीरेंद्र सिंह याच्या फेसबुक अकाउंटनुसार तो २०११ पासून राजकारणाशी संबंधित आहेत आणि भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगतो.
सीएम योगी यांनी कारवाईचे निर्देश दिले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेनंतर कारवाई केली आहे. त्यांनी एसडीएम, सीओ आणि इतर पोलिसांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आरोपींविरूद्ध कठोर कारवाईचेही निर्देश देण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times