शारजा: २०२०च्या ३१व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा () कर्णधार () ने दोन नवे विक्रम केले. विराट कोहलीचा हा RCBकडून २००वा सामना ठरला. तर जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मागे टाकला.

वाचा-
जखमी
वाचा-

शारजा मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब ( ) विरुद्धच्या सामन्यात विराटने ४८ धावा केल्या. या सामन्यात विराटला अर्धशतक करता आले नाही. पण त्याने १०वी धाव घेताच आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. याबाबत त्याने धोनीला मागे टाकले. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ हजार २७५ धावा केल्या आहेत. विराटने धोनीला मागे टाकले.

वाचा-

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता विराट कोहली अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर घसरला. या यादीत दिसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे. गंभीरने ३ हजार ५१८ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.

वाचा-

आज विराटने बेंगळुरूकडून २००वा सामना खेळला. अशी कामगिरी करणारा तो RCBचा पहिला खेळाडू ठरला आहे. इतक नव्हे तर आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूने एका संघाकडून आयपीएलमध्ये इतके सामने खेळले नाहीत.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here