शारजा: ipl 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) ८ विकेटनी पराभव केला. स्पर्धेत पहिल्या ७ पैकी ६ सामन्यात पराभव झाल्यामुळे पंजाबसाठी यापुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहे. यासाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत दिलेले १७२ धावांचे लक्ष्य त्यांनी अखेरच्या चेंडूवर षटकार मारून मिळवले. या विजयासह किंग्ज इलेव्हनचे ८ सामन्यात २ विजयासह ४ गुण झाले आहेत.

वाचा-

किंग्ज इलेव्हेन पंजाबच्या या विजयामुळे गुणतक्त्यात मात्र काहीच फरक पडला नाही. या सामन्याआधी पंजाब आठव्या क्रमांकावर होते. तर बेंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर तर हा सामना झाल्यानंतर देखील दोन्ही संघ आहे त्या ठिकाणी आहे.

वाचा-

गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी ८ पैकी ६ विजयासह १२ गुण मिळवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स असून त्यांनी ७ पैकी ५ विजयासह १० गुण मिळवलेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ८ पैकी ५ मध्ये विजय आणि ३ मध्ये पराभव मिळवत तिसरे स्थान कायम राखले आहे.

वाचा-

कोलकाता नाइट रायडर्स ८ गुणांसह चौथ्या, सनरायजर्स हैदराबाद ६ गुणांसह पाचव्या, चेन्नई सुपर किंग्ज इतक्याच गुणांसह सातव्या, राजस्थान रॉयल्स देखील ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. या तिनही संघांचे ६ गुण असले तरी सरासरीच्या जोरावर हैदराबाद पुढे आहे.

वाचा-

आज विजय मिळून देखील आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील आणि अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

वाचा-

स्पर्धेत शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. या लढतीनंतर बदलू शकतो.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here