कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा, अन्यथा मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू असा इशारा सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात देण्यात आला. यासाठी २९ ऑक्टोबरला पुण्यात पुढील आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धारही करण्यात आला. ( Latest Updates )

वाचा:

मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संघटनेच्या वतीने कोल्हापुरात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास श्रीमंत व खासदार छत्रपती उपस्थित होते.

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, मराठा समाज विविध पक्षात विखुरलेला आहे. काही काँग्रेस, काही राष्ट्रवादी तर काही शिवसेना व भाजपमध्येही आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष बाजूला ठेवत मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील दावा जिंकायचा आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारची ताकद आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहे. हीच ताकद सोबत नसेल तर लढा यशस्वी होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार मराठ्यांच्या बाजूने आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. आपली ताकद आपल्यासाठी वापरा, असे आवाहन करताना ते म्हणाले, मराठा हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. आपल्या इतर सर्व बंधूंवर आपलं लक्ष पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये. मात्र असं असताना आपल्यावर देखील अन्याय करून घेऊ नये. आरामात बसून आपल्याला काहीही मिळणार नाही. त्यासाठी आता मैदानात उतरायला हवे.

वाचा:

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाया भक्कम केला आहे. राज्यातील सर्व खासदारांना एकत्र केले आहे. आता दिल्लीला धडक मारायची आहे. तिथे आपली ताकद दाखवायची आहे, असे आवाहन यावेळी खासदार संभाजीराजे यांनी केले. जोपर्यंत आरक्षण आणि सारथी संस्थेला स्वायत्तता मिळणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, न्यायालयाने काही त्रुटी दाखवत आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आमचा संयम संपत चालला आहे. यामुळे सरकारने वेळेत हा प्रश्न सोडवला नाही तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

वाचा:

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रताप माने, सर्जेराव पवार, लालासाहेब गायकवाड, राजवर्धन निंबाळकर, कमलाकर जगदाळे यांच्यासह अनेकांनी आपली भूमिका मांडली. १९ ऑक्टोबर रोजी सरकारला निवेदन देण्याचा व २९ ऑक्टोबर रोजी पुण्यात सारथी बचाव यात्रा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दहा दिवसांत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्यास दिल्लीला धडक मारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here