मुंबईकरांना खऱ्या अर्थाने गारठवेल अशी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिवसादेखील कमाल तापमानाचा पारा घसरल्याने उन्हातही मुंबईकरांनी गारठा अनुभवला. रात्रीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेने दिली आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबईचं किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे, हे यंदाच्या हिवाळ्यातलं सर्वात कमी तापमान असणार आहे!
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईच्या घसरलेल्या तापमानाची माहिती दिली. ‘दिवसाचं कमाल तापमान घसरत आहे. शिवाय मुंबईचे वारेही खूप कोरडे आणि थंड आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
जानेवारी महिन्यातील सर्वात नीचांकी तापमान:
गेल्या तब्बल सहा दिवसांमध्ये मुंबईचं कमाल आणि किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत किमान तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आहे. हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात नीचांकी कमाल तापमान असल्याची माहितीही होसाळीकर यांनी दिली.
गेल्या सहा दिवसांतल्या तापमानाचा आढावा पहा –
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times