म. टा. प्रतिनिधी, पुणे: वंदेभारत योजनेअंतर्गत विदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच ( ) करोनाची चाचणी ( corona test ) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही चाचणी केल्यानंतर प्रवाशांना इन्स्टिट्यूशनल कॉरनटाइन होण्याची गरज भासणार नाही.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विमानतळ टर्मिनलच्या अरायव्हल हॉल मध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञामार्फत ही चाचणी केली जाणार आहे. चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागेल. त्यासाठी लागणारे शुल्क कॅशलेस पद्धतीने देता येणार आहेत, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे.

चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा करणे शक्य नसल्यास, त्यांना हॉटेलमध्ये कॉरनटाइन होण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना घरी कॉरनटाइन व्हावे लागेल. तर, पॉझिटिव्ह आल्यास इन्स्टिट्यूशनल कॉरनटाइन व्हावे लागणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here