म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे दुर्धर आजारांवर मात करणे शक्य झाले आहे. थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या सहा वर्षीय अभिजीतला बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसाठी त्याच्याशी जुळणाऱ्या ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन (एचएलए)ची गरज होती. आयव्हीएफ माध्यमातून जन्माला आलेल्या बाळाच्या (त्याची बहीण) मदतीने हा घटक उपलब्ध झाल्याने अभिजीतला जीवनदान मिळाले आहे.

सहदेव आणि अल्पा सोळंकी यांच्या अभिजीत या मुलाला होता. दर महिन्याला त्याला रक्त बदलावे लागायचे. या मुलावरील उपचाराचा अखेरचा पर्याय म्हणून बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला सोळंकी कुटुंबाला देण्यात आला. मात्र मुलाशी जुळणारे ह्युमन ल्यूकोसाइट अँटिजेन (एचएलए) असणारा दाता मिळत नव्हता. सोळंकी यांनी स्वत:ही वैद्यकीय उपचारांच्या पर्यायांचा सखोल अभ्यास केला. डॉ. मनीष बँकर यांच्याशी चर्चा केली. सोळंकी यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाने अपत्य जन्माला घालण्याचे ठरवले. गर्भधारणा झाल्यानंतर या बाळामध्ये अभिजीतशी जुळणारे एचएलए होते. या बाळाचा जन्म झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये अभिजीतवर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट करण्याचा निर्णय घेतला.

भारतातील पहिले ‘सेव्हिअर सिबलिंग’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. थॅलेसेमिया मेजरच्या रुग्णांसाठी एचएलए जुळणाऱ्या दात्याकडून मिळालेल्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण हा उपचारांचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अभिजीतला बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसाठी एचएलए जुळणारा दाता बिहणीच्या रूपात मिळाला. त्याच्या बहिणीच्या नाळेतील रक्त किंवा हिमॅटोपॉइटिक स्टेम सेल्स मिळाल्याने त्याला जीवनदान मिळाले. ह्युमन ल्यूकोसाइट अँटिजेन मॅचिंग नामक पद्धतीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या या बाळाने भावाला जीवनदान दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here