पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असंही सांगायला ते विसरले नाही.

भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, ज्यात पुढील निर्णयावर मंथन झाल्याची माहिती आहे. खडसेंनी यावर थेट काहीही सांगितलेलं नाही. तर राष्ट्रवादीकडूनही मौन बाळगलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्याला काहीही माहित नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.

गेल्या काही वर्षांपासून डावललं जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे भाजपात नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेकदा थेट नाव घेऊन निशाणाही साधला होता. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here