कोल्हापूरः अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ” () हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाने अक्षरशः वेड लावले आहे. कोल्हापुरात तर अजय देवगणच्या चाहत्यांनी ‘तानाजी’ची एन्ट्री होताच सिनेमागृहात पैशांची उधळण केली आहे. पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अजय देवगणची चित्रपटात एन्ट्री होताच लोकांनी शिट्या मारल्या, काही चाहत्यांनी तर चित्रपटगृहातच पैसे उधळले. हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट शंभर कोटीच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. तानाजीने सध्या धुमाकूळ घातला असून भारतात एकूण ३८८० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात आहे. यात २ डी आणि ३ डी दोन्ही फॉर्मेटमध्ये हा चित्रपट पाहिला जात आहे. तर विदेशात ६६० स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवला जात आहे. म्हणजेच तानाजी एकूण ४५४० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला आहे.

अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. फक्त सहा दिवसांमध्ये अजय- सैफच्या या सिनेमाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला १०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here