मुंबईत नियंत्रणात येत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार तसेच दुकाने व व्यापारी आस्थापनांना व्यवसायासाठी दोन ते तीन तास वाढवून देण्यात आले आहेत.
व्यापारी संघटनांनी दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांची वेळ वाढवून देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यानुसार आता हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार, सकाळी सात ते साडेअकरा वाजेपर्यंत तर व्यापारी आस्थापना सात ते साडेनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्तच्या शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, हॉल या गर्दीच्या ठिकाणांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी दिलेल्या आस्थापना व हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षित वावराचे नियम बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times